SIALKOT GATHA / सियालकोट गाथा / book cover

SIALKOT GATHA / सियालकोट गाथा /

Published: 13 Apr 2023
View on Amazon

Description

स्वातंत्र्योत्तर भारतात घडणारी `सियालकोट सागा` ही कथा आहे दोन व्यासायिकांच्या शत्रुत्वाची. अरबाझ आणि अरविंद.. फाळणीच्या वेळी सियालकोट वरून भारतात येण्यासाठी निघालेल्या शेवटच्या ट्रेनमध्ये ही गोष्ट सुरु होते. त्यानंतर कथा कलकत्ता आणि मुंबईमध्ये घडते. जवाहरलाल नेहरू ते मनमोहनसिंग असे सर्व पंतप्रधान पाहिलेली दोन मुलं आपल्या आपल्या आयुष्यात मोठी मोठी होत जातात. ते दोघे भारतातील महत्वाच्या व्यक्तींच्या यादीत येतात. मंत्रिपदापासून समित्यांच्या अध्यक्ष पदापर्यंतची निरनिराळी पदं भूषवतात. त्यांच्या वैयक्तिक वाढीसोबत त्यांच्यामधले शत्रुत्व वाढत जाते. त्यांच्या शत्रुत्वाच्या कथेसोबत येते समकालीन भारताची कथा. सत्तांतरे, गरिबी हटाव पासून रथयात्रेपर्यंतच्या मोठ्या घटना, लातूर-भुजच्या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, साखळी बॉम्ब पासून २६/११ पर्यंतचे दहशतवादी हल्ले.. असा भारताचा सर्व महत्वाचा समकालीन इतिहास कथेमध्ये अगदी सहज येतो आणि वाचणाऱ्या प्रत्येक भारतीयाला कथानकाशी जोडून घेतो. या समकालीन इतिहासाला लेखकाने जोडले आहे महाराजा अशोकाच्या काळातील एका कथानकाशी. तेव्हापासून जतन केलेले गुपित पुढच्या पुढच्या पिढीकडे कसे सोपवले जाते आणि आपल्या समृद्ध आणि सुवर्ण इतिहासासमोर आजचे शत्रुत्व कसे फिके पडते हे सांगणारे `सियालकोट सागा` हे पुस्तक. लाखो प्रतींची विक्रमी विक्री झालेले आणि एका बैठकीत वाचून पूर्ण करावे असे. कारुण्य, उत्कंठा, शत्रुत्व, प्रेम, योगायोग यांचा अपूर्व संगम असणारे `द सियालकोट सागा`.